Wednesday, November 4, 2015
रयत’चा नवोपक्रम : गुरुकुल प्रकल्प
रयत’चा नवोपक्रम : गुरुकुल प्रकल्प
प्रा. सतीश शिर्के
शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे, हे
ओळखून हजारो वर्षापासून शिक्षण न मिळालेल्या
बहुजन समाजाच्या उद्धारासाठी शिक्षणाची गंगा
खेड्यापाड्यात व झोपडीत नेली ती पद्मभूषण डॉ.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. शिक्षणाचे
सार्वत्रिकीकरण करण्यासाठी १९१९ साली रयत
शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली. आज ही
संस्था देशातील एक शैक्षणिक चळवळ बनली आहे.
देशात शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तन या
संस्थेने घडवून आणले आहे.
लाखो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत रयत शिक्षण
संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक मुलात
काहीतरी दडलेले असतेच. त्यास हिऱ्याप्रमाणे पैलू
पाडण्याची, त्याच्यातील गुणवैशिष्ट्ये शोधण्याची
व त्याला प्रगतीची संधी देण्याची भूमिका
कर्मवीरांना घेतली. अण्णांनी ग्रामीण भागातील
प्रज्ञावान, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी
सातारा येथे जून १९४०मध्ये महाराजा सयाजीराव
मोफत व वसतिगृहयुक्त विद्यालयाची स्थापना केली.
या विद्यालयाचे ते दहा वर्ष स्कूल कमिटीचे चेअरमन
होते. १९९४पासून अण्णांचे नातू व रयत शिक्षण संस्थेचे
विद्यमान चेअरमन डॉ. अनिल पाटील स्कूल कमिटीचे
चेअरमन आहेत. ते अण्णांप्रमाणेचे रयत शिक्षण
संस्थेसाठी झिजणारे. त्यांनी निवासी गुरुकुल प्रकल्प,
अनिवासी गुरुकुल प्रकल्प, दूरस्थ गुरुकुल प्रकल्प, मिनी
गुरुकुल प्रकल्प, सेमी इंग्रजी याद्वारे विद्यार्थ्यांच्या
गुणवत्तेत अप्रतिम बदल घडवून आणला आहे. या संस्थेच्या
गुरुकुल प्रकल्पाचा हा लेखाजोखा.
ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये सेमी
इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचा महाराष्ट्रात पहिला
प्रयोग ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या
मार्गदर्शनाखाली डॉ. अनिल पाटील यांनी
'रयत'मध्ये प्रथम सुरू केला. यामुळे ग्रामीण
विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची सोय उपलब्ध
झाली.
आज असाच एक नवोपक्रम म्हणजे गुरुकुल प्रकल्प. जे
घडावे पण घडत नाही, ते घडवून आणण्याचे सामर्थ्य
शिक्षणात असते. परंतु संस्कारांची निर्मिती व
रुजवणूक करण्यात आजचे शिक्षण अपयशी ठरले आहे.
शिक्षण वळण राहिले नसून दळण बनले आहे.
विद्यार्थ्यांची संख्यात्मक वाढ झाली पण गुणात्मक
वाढ होण्याची आवश्यकता भासली, म्हणून ग्रामीण
भागातील प्रज्ञावान व होतकरू मुलांचा शोध घेऊन
त्यांना सातारा शहरात सर्व शैक्षणिक सोयी पुरवून
अध्यापकांच्या सानिध्यात राहण्याची संधी
निर्माण करून देण्यासाठी विद्यालयात स्कूल
कमिटीचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या प्रेरणेने
१९९५पासून महाराजा सयाजीराव विद्यालयात
गुरुकुल प्रकल्प सुरू करण्यात आला. एक तुकडी आणि ३७
विद्यार्थ्यांसह सुरू केलेला हा प्रकल्प आता
वटवृक्षाप्रमाणे विस्तारला असून, या प्रकल्पाचे यश
पाहून संस्थेच्या अन्य शाखांतून अशा प्रकल्पांची
उभारणी झाली आहे. स्थानिक परिस्थितीचा
विचार करून संस्थेने निवासी, अनिवासी, दूरस्थ,
मिनी गुरुकुल असे प्रकल्प सुरू केले आहेत. आज
राज्यातील ३४२ शाळांतील आठ हजार २१०
विद्यार्थी गुरुकुलमध्ये शिक्षण घेत आहेत.
शिक्षणाने व्यक्तिमत्वाचा विकास साधला
पाहिजे. केवळ यांत्रिकपणे काम करण्यासाठी
विद्यार्थ्यांना तयार करण्याऐवजी त्यांच्यात
स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवत शिक्षणाद्वारे
निर्माण झाली पाहिजे. शाळेत जे शिकवले जाते, ते
विसरल्यानंतर विद्यार्थ्यांजवळ जे उरते हे खरे शिक्षण.
शिक्षणक्षेत्राला पथदर्शी ठरणारा हा प्रकल्प सुरू
करताना संस्थेने काही मुलांना स्वयंअध्ययनाची सवय
लावून आत्मविश्वास निर्माण करणे, शैक्षणिक दर्जा
सुधारणे, स्वावलंबनाचे महत्व, अभिरुचीचा शोध घेणे,
विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा, लेखन, वाचन,
वक्तृत्व, नाट्य या गुणांचा विकास करणे. विविध
शिष्यवृत्ती व शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करून
घेणे. शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन
करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे.
गुरुकुलसाठी गुणवत्ता यादीप्रमाणे विद्यार्थ्यांची
निवड केली जाते. यासाठी सुसज्ज वर्ग खोल्या,
एलसीडी, संगणक, विज्ञान -गणित-भूगोल
प्रयोगशाळा, पुरेसे क्रीडा साहित्य, संगीत, कला वर्ग
या पायाभूत घटकांची पूर्तता केली जाते. कर्मवीर
विद्याप्रबोधिनीअंतर्गत हा प्रकल्प राबविला
जातो. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे तयार केली
आहेत. या तुकड्यांना सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात
आले. मुलांसाठी सकाळी दोन तास व रात्री दोन
तास अभ्यासिका घेण्यात येते. यामध्ये सकाळी एक
तासाच्या अभ्यासासाठी पीपीटी व एलसीडी
लॅबचा वापर केला जातो. कृतीयुक्त अध्यापनावर भर
दिला जातो. इंग्रजी संभाषण, गटचर्चा होतात.
परीक्षेनंतर शिक्षकाकडून प्रश्नानुसार सूक्ष्मगुण
मूल्यांकन करून लिखित मार्गदर्शन केले जाते. उत्तर
पत्रिकांची अंतर्गत व बाह्य तपासणी करून
बाह्यतज्ज्ञ मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन केले जाते.
दररोज १० मिनिटे टीव्हीवरील इंग्रजी बातम्या
पाहणे, आठवड्यात किमान एका इंग्रजी
वर्तमानपत्राचे वाचन, प्रार्थनासमयी इंग्रजी
बातम्या, इंग्रजी संभाषणासाठी संस्थेने दर्जेदार
पुस्तके तयार केली आहेत. गुरुकलच्या प्रत्येक
विद्यार्थ्याकडून ग्रंथालयातील १२ निवडक पुस्तकाचे
अवांतर वाचन करून त्याची नोंद ठेवली जाते. प्रत्येक
वर्गवार किंवा विषयवार हस्तलिखित तयार केली
जातात. भाषावार वक्तृत्व स्पर्धा, तज्ज्ञांची
व्याख्याने , क्षेत्रभेट, व्यवसाय मार्गदर्शन,
कार्यशाळा, स्नेहसंमेलन यांचे आयोजन केले जाते.
गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता
चाचणी, बुद्ध्यांक चाचणी घेण्यात येते.
गुरुकुल विद्यार्थी जवळजवळ १२ तास शाळेत असतो.
त्याच्या आरोग्यासाठी खेळ, योग, व्यायामासोबत
आयोग्यतपासणी होते. सध्याच्या वेगवान जगात
कोचिंग क्लासच्या संस्कृतीत तसेच पाळणाघरात
वाढलेल्या बालकांना पालकांचा सहवास दुर्मिळ
झाला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा
सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न गुरुकुल प्रकल्प
करीत आहे. आणि पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते -
रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.
सौजन्य

Thursday, October 22, 2015
चला नवविचारांचे सोने वाटूया
नवविचारांचे सोने वाटूया
आज दशहरा
दसरा
विजयादशमी
कसलं सोन लुटतो आम्ही?
लुटणे म्हणजे चोरी.
लुटणे म्हणजे बळाचा वापर करून अन्यायकारकपणे
कोणाच्या धनाचे, इज्जतीचे हरण करणे.
जसे घर लुटणे.
इज्जत लुटणे.
चला आजपासून नवा विचार आचरणात आणू
लुटायला सोडून वाटायला सुरुवात करू.
"लुटणे" पेक्षा "वाटणे" खचितच सुखकारक व आनंदप्रद आहे.
काय वाटायचं?
भूमिपुत्र गौतमाची करुण मानवता,
अशोकाचा स्वविजय,
जीजाऊचे अमिट संस्कार,
शिवबांचा अतुल्य पुरुषार्थ,
तुकोबांच्या गाथा,
ज्योतीबांचे अनमोल विचारधन,
सावित्रीचे अक्षय अक्षरधन,
शाहूंचे राजेशाही औदार्य,
कर्मवीरांची मरणप्राय तळमळ,
भिमरावाची उत्तुंग विद्वत्ता,
रमाईचा त्याग,
अहिल्याबाईची दूरदृष्टी
चला करू सिमोलंघन.
कसलं सिमोलंघन?
चला करू सिमोलंघन जातीयतेचे,
चला करू सिमोलंघन धर्मभेदाचे,
चला करू सिमोलंघन अस्पृश्येतेचे,
चला करू सिमोलंघन अंधश्रद्धेचे,
चला करू सिमोलंघन निरक्षरतेचे,
चला करू सिमोलंघन जुन्या रूढी,
चला करू सिमोलंघन स्त्रीदास्याचे,
चला करू शस्त्रपूजन.
लेखन-पाटीचे,
पेन-वहीचे,
ग्रंथ-पुस्तकाचे,
अभिनव संगणकाचे...
आम्ही परिवर्तनवादी आहोत, रूढीवादी नाही,
आम्ही निसर्गपूजक आहोत,निसर्गसंहारक नाही,
आम्ही मानवतावादी आहोत, दानवी नाहीत,
आंम्ही धार्मिक आहोत, धर्मपाखंडी नाही,
सुविचारांचे पूजक आहोत, काळ्या मातीचे भक्त,
विजयाचा उन्माद साजरा करणारे नाहीत
तर पराजीताला सन्मानाने वागविणारे
दृढ सहिष्णू आहोत...
सोने लुटून त्याची माती करण्यापेक्षा
मातीसाठी झिझून बळीच राज्य आणूया.

Sunday, October 18, 2015
अविस्मरणीय क्षण.....
Gr8 moment in life
दिनांक 03/09/2015
वार -शनिवार
स्थळ- रयत शिक्षण संस्था ऑफिस सातारा
श्री छत्रपति शिवाजी विद्यालय घोगरगाव या आमच्या शाळेचा आणि अजुन बरीचशी शैक्षणिक माहिती असणारा माझा ब्लॉग rayatghogargaon.blogspot.com
याचे औपचारिक उदघाट्न रयत शिक्षण संस्थेचे सचिव.मा श्री. डॉ गणेश ठाकुर साहेब ,यांच्या हस्ते आणि सहसचिव मा.श्री.दीनानाथ पाटिल साहेब , मध्यविभागाचे विभागीय अधिकारी मा.श्री.कमलाकर महामुनी साहेब , मुख्याध्यापक श्री दुस सर पर्यवेक्षक श्री खेतमाळस सर आणि आमच्या संपूर्ण शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत झाले.
आपणही सदर ब्लॉग ला भेट देऊन काही सुचना असतील तर द्याव्यात
आपलाच
अमोल रामचंद्र निंबोरे
उपशिक्षक
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय घोगरगाव
मोबाईल :- ९८९०८७३२३३

क्षण गौरवाचा ...
विद्यालयाच्या गौरव करणारा क्षण म्हणला तर वावग ठरणार नाही . कारण आमच्या शाळेचा गुरुकुलचा विद्यार्थी करन बाबासाहेब पवार इयत्ता 9 वी " अ " याला रयत शिक्षण संस्थेच्या वतीने पहिला " आदरणीय दादा पाटिल स्मृति आदर्श विद्यार्थी पुरस्कार " रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनी 4 ऑक्टोबर 2015 रोजी सातारा येथे देण्यात आला. आपणा सर्वांच्या शुभेच्छा व प्रेरणा आहेतच. . आपले प्रोत्साहन व प्रेरणा त्याच्या सतत पाठीशी आहेतच.
खर तर करण पहिल्यापासूनच प्रत्येक शालेय उपक्रमात सहभाग तर घेतच पण पूर्ण तयारीनिशी उपक्रम पूर्ण करत .
आता पर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात त्याने विविध परीक्षेत नैपुण्य प्राप्त केले. मग त्यात प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगरगाव येथे. 4 थी शिष्यवृत्ति पात्र,7 वि शिष्यवृत्ति पात्र, RTS शिष्यवृत्ति पात्र, रयत ऑलिम्पियाड शिष्यवृत्तिसाठी पात्र, संगीत मध्यमा (गायन), मध्यमा (तबला), कराटे (ऑरेन्ज) बेल्ट, अनेक स्पर्धातुन निबंध, वक्तृत्व, चित्रकला, विज्ञान प्रदर्शन यामध्ये यश मिळवले .
त्याच्या या यशात सिंहाचा वाटा त्याचे वडील श्री.बाबासाहेब पवार व आई सौ. जयश्री बाबासाहेब पवार आणि त्याला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा, शाळेचा, संस्थेचा व त्याच्या प्रयत्नाचा आहे.
आपणा सर्व हितचिंतकांचे आभार व धन्यवाद.

Sunday, September 27, 2015
Friday, September 25, 2015
Tuesday, September 22, 2015
कर्मवीर जयंती उत्साहात साजरी
आज दि. २२ सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती म्हणजेज रयत परिवाराची जणू दिवाळीच , आज विद्यालयात सकाळ पासूनच प्रत्येक कोणत्याना कोणत्या कामात व्यस्थ होता. इ. १० वी अ व इ.१० वी ब च्या मुलांनी आण्णा च्या मिरवणुकीसाठी आणलेल्या रथ आणि ट्रक्टर ची खूप सुंदर सजावट केली.याकामात श्री. मोरे सर ,श्री.उल्हारे सर ,श्री.सोगीर सर ,श्री.जवरे सर यांनी याकामी मदत केली .
सकाळी ९.०० वा. मा. प्राचार्य .श्री.ढूस .एस.के. व स्कूल कमिटी सदस्य श्री. नामदार भाई शेख यांनी रथातील प्रतिमेचे पूजन केले.तर ट्रक्टर मधील प्रतिमेचे पूजन मा. पर्यवेक्षक श्री. खेतमाळस एस.बी . यांनी केले. यावेळी सांस्कुतिक विभागाने संगीत शिक्षक श्री.खिळे सरांच्या मार्गदर्शनाखाली रयत गीत ,कर्मवीर स्तवन सादर केले.
यानंतर इ. ५ वी ते इ.१२ वी अखेर विद्यार्थ्यांची गावात प्रभातफेरी निघाली. प्रभात फेरीच्या अग्रस्थानी झांज व लेझीम पथक आपली वाद्यासह कला सादर करत होते. यामध्ये श्री.खोडदे सर ,श्री. वारुळे सर , श्री.गुंड सर यांचा सहभाग पाहण्याजोगा होता .गावामध्ये तर या कला पथकाने सर्वांचीच कौतुकाची थाप मिळवली

Subscribe to:
Posts (Atom)