रयत शिक्षण संस्थेच्या, श्री.छत्रपती शिवाजी विदयालयाच्या शैक्षणिक ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत !!

Thursday, October 22, 2015

चला नवविचारांचे सोने वाटूया

 नवविचारांचे सोने वाटूया
आज दशहरा
दसरा
विजयादशमी

कसलं सोन लुटतो आम्ही?
लुटणे म्हणजे चोरी.
लुटणे म्हणजे बळाचा वापर करून अन्यायकारकपणे
कोणाच्या धनाचे, इज्जतीचे हरण करणे.
जसे घर लुटणे.
इज्जत लुटणे.

चला आजपासून नवा विचार आचरणात आणू
लुटायला सोडून वाटायला सुरुवात करू.
"लुटणे" पेक्षा "वाटणे"  खचितच सुखकारक व आनंदप्रद आहे.

काय वाटायचं?
भूमिपुत्र गौतमाची करुण मानवता,
अशोकाचा स्वविजय,
जीजाऊचे अमिट संस्कार,
शिवबांचा अतुल्य पुरुषार्थ,
तुकोबांच्या गाथा,
ज्योतीबांचे अनमोल विचारधन,
सावित्रीचे अक्षय अक्षरधन,
शाहूंचे राजेशाही औदार्य,
कर्मवीरांची मरणप्राय तळमळ,
भिमरावाची उत्तुंग विद्वत्ता,
रमाईचा त्याग,
अहिल्याबाईची दूरदृष्टी

चला करू सिमोलंघन.
कसलं सिमोलंघन?
चला करू सिमोलंघन जातीयतेचे,
चला करू सिमोलंघन धर्मभेदाचे,
चला करू सिमोलंघन अस्पृश्येतेचे,
चला करू सिमोलंघन अंधश्रद्धेचे,
चला करू सिमोलंघन निरक्षरतेचे,
चला करू सिमोलंघन जुन्या रूढी,
चला करू सिमोलंघन स्त्रीदास्याचे,

चला करू शस्त्रपूजन.
लेखन-पाटीचे,
पेन-वहीचे,
ग्रंथ-पुस्तकाचे,
अभिनव संगणकाचे...

आम्ही परिवर्तनवादी आहोत, रूढीवादी नाही,
आम्ही निसर्गपूजक आहोत,निसर्गसंहारक नाही,
आम्ही मानवतावादी आहोत, दानवी नाहीत,
आंम्ही धार्मिक आहोत, धर्मपाखंडी नाही,
सुविचारांचे पूजक आहोत, काळ्या मातीचे भक्त,
विजयाचा उन्माद साजरा करणारे नाहीत
तर पराजीताला सन्मानाने वागविणारे
दृढ सहिष्णू आहोत...
सोने लुटून त्याची माती करण्यापेक्षा
मातीसाठी झिझून बळीच राज्य आणूया.

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा