रयत शिक्षण संस्थेच्या, श्री.छत्रपती शिवाजी विदयालयाच्या शैक्षणिक ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत !!

Thursday, October 22, 2015

चला नवविचारांचे सोने वाटूया

 नवविचारांचे सोने वाटूया
आज दशहरा
दसरा
विजयादशमी

कसलं सोन लुटतो आम्ही?
लुटणे म्हणजे चोरी.
लुटणे म्हणजे बळाचा वापर करून अन्यायकारकपणे
कोणाच्या धनाचे, इज्जतीचे हरण करणे.
जसे घर लुटणे.
इज्जत लुटणे.

चला आजपासून नवा विचार आचरणात आणू
लुटायला सोडून वाटायला सुरुवात करू.
"लुटणे" पेक्षा "वाटणे"  खचितच सुखकारक व आनंदप्रद आहे.

काय वाटायचं?
भूमिपुत्र गौतमाची करुण मानवता,
अशोकाचा स्वविजय,
जीजाऊचे अमिट संस्कार,
शिवबांचा अतुल्य पुरुषार्थ,
तुकोबांच्या गाथा,
ज्योतीबांचे अनमोल विचारधन,
सावित्रीचे अक्षय अक्षरधन,
शाहूंचे राजेशाही औदार्य,
कर्मवीरांची मरणप्राय तळमळ,
भिमरावाची उत्तुंग विद्वत्ता,
रमाईचा त्याग,
अहिल्याबाईची दूरदृष्टी

चला करू सिमोलंघन.
कसलं सिमोलंघन?
चला करू सिमोलंघन जातीयतेचे,
चला करू सिमोलंघन धर्मभेदाचे,
चला करू सिमोलंघन अस्पृश्येतेचे,
चला करू सिमोलंघन अंधश्रद्धेचे,
चला करू सिमोलंघन निरक्षरतेचे,
चला करू सिमोलंघन जुन्या रूढी,
चला करू सिमोलंघन स्त्रीदास्याचे,

चला करू शस्त्रपूजन.
लेखन-पाटीचे,
पेन-वहीचे,
ग्रंथ-पुस्तकाचे,
अभिनव संगणकाचे...

आम्ही परिवर्तनवादी आहोत, रूढीवादी नाही,
आम्ही निसर्गपूजक आहोत,निसर्गसंहारक नाही,
आम्ही मानवतावादी आहोत, दानवी नाहीत,
आंम्ही धार्मिक आहोत, धर्मपाखंडी नाही,
सुविचारांचे पूजक आहोत, काळ्या मातीचे भक्त,
विजयाचा उन्माद साजरा करणारे नाहीत
तर पराजीताला सन्मानाने वागविणारे
दृढ सहिष्णू आहोत...
सोने लुटून त्याची माती करण्यापेक्षा
मातीसाठी झिझून बळीच राज्य आणूया.

Sunday, October 18, 2015

अविस्मरणीय क्षण.....

Gr8 moment in life

दिनांक 03/09/2015

वार -शनिवार

 स्थळ- रयत शिक्षण संस्था ऑफिस सातारा

श्री छत्रपति शिवाजी विद्यालय  घोगरगाव या आमच्या शाळेचा आणि अजुन बरीचशी शैक्षणिक माहिती  असणारा माझा  ब्लॉग rayatghogargaon.blogspot.com
 याचे औपचारिक उदघाट्न रयत शिक्षण संस्थेचे सचिव.मा श्री. डॉ गणेश ठाकुर साहेब ,यांच्या हस्ते आणि सहसचिव मा.श्री.दीनानाथ पाटिल साहेब , मध्यविभागाचे विभागीय अधिकारी मा.श्री.कमलाकर महामुनी साहेब , मुख्याध्यापक श्री दुस सर पर्यवेक्षक श्री खेतमाळस सर आणि आमच्या संपूर्ण शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत झाले.
      आपणही सदर ब्लॉग ला भेट देऊन काही सुचना असतील तर द्याव्यात

       
                                                                                       आपलाच
                                                                              अमोल रामचंद्र निंबोरे
                                                                                     उपशिक्षक
                                                                 श्री छत्रपती शिवाजी विद्यालय घोगरगाव
                                                                           मोबाईल  :- ९८९०८७३२३३

      

क्षण गौरवाचा ...

      विद्यालयाच्या गौरव करणारा क्षण म्हणला तर वावग ठरणार नाही . कारण आमच्या शाळेचा गुरुकुलचा  विद्यार्थी  करन बाबासाहेब पवार इयत्ता 9 वी " अ "  याला रयत शिक्षण संस्थेच्या वतीने पहिला " आदरणीय दादा पाटिल स्मृति आदर्श विद्यार्थी पुरस्कार " रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनी 4 ऑक्टोबर 2015 रोजी सातारा येथे देण्यात आला. आपणा सर्वांच्या शुभेच्छा व प्रेरणा आहेतच. . आपले प्रोत्साहन व प्रेरणा त्याच्या सतत पाठीशी आहेतच. 
            खर तर करण  पहिल्यापासूनच प्रत्येक शालेय उपक्रमात सहभाग तर घेतच पण पूर्ण तयारीनिशी उपक्रम पूर्ण करत .
आता पर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात त्याने विविध परीक्षेत नैपुण्य प्राप्त केले. मग त्यात  प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगरगाव येथे. 4 थी शिष्यवृत्ति पात्र,7 वि शिष्यवृत्ति पात्र, RTS शिष्यवृत्ति पात्र, रयत ऑलिम्पियाड शिष्यवृत्तिसाठी पात्र, संगीत मध्यमा (गायन), मध्यमा (तबला), कराटे (ऑरेन्ज) बेल्ट, अनेक स्पर्धातुन निबंध, वक्तृत्व, चित्रकला, विज्ञान प्रदर्शन यामध्ये यश मिळवले .
      त्याच्या या  यशात सिंहाचा वाटा त्याचे वडील श्री.बाबासाहेब पवार व आई सौ. जयश्री बाबासाहेब पवार आणि त्याला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा, शाळेचा, संस्थेचा व त्याच्या प्रयत्नाचा आहे.

आपणा सर्व हितचिंतकांचे आभार व धन्यवाद.