रयत शिक्षण संस्थेच्या, श्री.छत्रपती शिवाजी विदयालयाच्या शैक्षणिक ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत !!

Sunday, October 1, 2023

घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन


 
      महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा (इयत्ता आठवी) या वर्गाचा अंतरिम निकाल नुकताच संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेत घोगरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या  श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या शिष्यवृती परीक्षेसाठी  39 विद्यार्थी पात्र ठरले तसेच इयत्ता आठवीच्या शिष्यवृती परीक्षेसाठी  27  विद्यार्थी पात्र ठरले व विद्यालायची निकालाची परंपरा कायम ठेवली.
    
     इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी  
 तरटे आदित्य अजिनाथ-234 , वाघ सुयश शिवाजी-208 , वाळके अभिषेक अरुण-206 , वाघ आदित्य संदीप-202, शेख रिहान सलीम-202 , काळे विकी भाऊसाहेब-192 , कु.गांगर्डे प्राजक्ता अंबादास-186 , गांगर्डे आदित्य संदीप-182 , कु.देवकाते आकांक्षा प्रकाश-180 , कु.गारुडकर आकांक्षा नवनाथ-178
 
इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृती  परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी 
 रायकर प्रतीक सतीश-196 , कु.शिंदे अनुराधा भरत-180  , कु.भोस श्रावणी संदीप-172 , कु.वाघुले साक्षी सुनील-170  , कु.गांगर्डे प्राची रमेश-168 , बोरुडे सुमित शंकर-164 , धामणे विराज शिवराज-164 , काळे ज्ञानेश्वर बाळासाहेब-156 , कु.वाघ स्नेहल शिवाजी-154 , तापकीर यशोदीप विकास-154

          इयता पाचवी शिष्यवृती विभागप्रमुख श्री सचिन गारुडकर , मार्गदर्शक शिक्षक श्री मनोज शितोळे , श्री अशोक शिंदे , सौ.सारिका शितोळे  तसेच आठवी शिष्यवृती विभागप्रमुख श्री दत्ता हजारे , मार्गदर्शक शिक्षक श्री बापूसाहेब खिळे, भाऊसाहेब साठे, अंबादास कोथिंबीरे यांनी मार्गदर्शन केले.

        यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा पर्यवेक्षक श्री अविनाश गांगर्डे (लाईफ मेंबर र.शि.सं,सातारा), माजी प्राचार्य श्री सीताराम ढूस (लाईफ मेंबर र.शि.सं,सातारा) , गुरुकुल प्रमुख अशोक शिंदे , रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस , विभागीय अधिकारी श्री तुकाराम कन्हेरकर यांनी तसेच  सरपंच बाळासाहेब उगले, उपसरपंच सोमनाथ उगले , माजी सरपंच डॉ.दिलीप भोस, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य तुकाराम उगले , नामदारभाई शेख , घोगरगाव व पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा