रयत शिक्षण संस्थेच्या, श्री.छत्रपती शिवाजी विदयालयाच्या शैक्षणिक ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत !!

Friday, July 31, 2020

श्री.बापूसाहेब खिळे रयतमधील प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त

घोगरगाव :- रयत शिक्षण संस्थेचे,श्री छत्रपती शिवाजी विद्यालय घोगरगाव या विद्यालयातील स.शास्त्र व मराठी विषयाचे तज्ञ शिक्षक तथा आदर्श संगीत गुरु, शिस्तबद्ध व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य #श्री_बापूसाहेब_बलभीमराव_खिळे_सर (http://M.com/ B.Ed) हे जवळजवळ 32 वर्षे सेवा करून शासकीय नियम व नियत वयोमानानुसार 30-06-2020 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.अतिशय खडतर परिस्थितीतून कष्ट करून शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.व आपल्या नोकरीची सुरुवात १८-१०-१९८८ रोजी रयत शिक्षण संस्थेत CHB तत्वावर रुकडी जिल्हा कोल्हापूर येथे तात्पुरत्या स्वरुपात 4 वर्षे जुनिअर कॉलेज वर काम केले. नंतर संस्थेने त्यांना माध्यमिक विभागात दिनांक २४-१२-१९९२ मध्ये कोळगाव ता.श्रीगोंदा येथे नियमित पदावर नियुक्ती दिली.तेथे अडीच वर्ष सेवा केली. त्यानंतर नागेश विद्यालय जामखेड 9 वर्षे,सोनगाव सात्रळ ता.राहुरी येथे 10 वर्षे ,गणेशनगर येथे 4 महिने व शेवटी 1 -12-2012 ते 30-06-2020 घोगरगाव येथे आठ वर्षे सेवा झाली. अतिशय प्रामाणिक व सचोटीने कोणतेही काम पूर्ण करण्याचा त्यांचा हातखंडा होता.संगीत व अध्यात्म या विषयाची आवड असल्यामुळे अनेक विद्यार्थी संगीत विशारद घडविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.शेवटच्या 5 - 6 वर्षात त्यांनी संगणक व त्याचा वापर शिक्षणात कसा करायचा हे शिकून घेतले सहसा बरेच शिक्षक कंटाळा करतात परंतू त्यांनी ते पूर्ण केले.विद्यालयात त्यांनी सांस्कृतिक विभाग सक्षमपणे सांभाळला.वयाच्या 58 व्या वर्षी ते सेवानिवृत्त होत आहेत.
       आई वडील व पत्नी तसेच दोन विवाहित मुली व एक अविवाहित मुलगा असा परिवार आहे..दोन्ही मुली सुशिक्षित व संगीत विशारद आहेत.थोरले जावई बागल इंजिनिअर व धाकटे जावई भोस पोलिस दलात सेवा बजावीत आहेत. मुलगा इंजिनिअर व संगीत विशारद आहे.असा सुखी परिवार आहे.आज तुम्हाला वाटत असेल की, हा दिवस तुमच्या कामाचा शेवट आहे. पण थोडं थांबा कारण ही तुमच्या नव्या आयुष्याची अनोखी सुरुवात आहे.आता कुटुंबाला पूर्व वेळ देता येईल.
         बापूसाहेब खिळे सर आपणास सेवापूर्ती नंतरचे पुढील आयुष्य सुख समृद्धी व भरभराटीचे जावो.हीच पांडुरंग चरणी प्रार्थना !!
      (टीप :-१ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. सेवानिवृती व आषाढी एकादशी हा दुग्धशर्करा योग आहे.कारण विद्यालयात दरवर्षी जवळपास १० ते १२ दिंड्या मुक्कामी व विश्रांती साठी थांबत असतात.व आध्यात्मिक आवड असल्यामुळे शाळा व वर्ग सांभाळून त्यांची सेवा व समन्वय साधण्याचे काम आपण करत असतात.यंदा कोरोनामुळे पालखी सोहळा रद्द झाल्यामुळे थोडीसी खंत मनात असेल,असो आता पूर्णवेळ आपणास पांडुरंगाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. )
पुन्हा एकदा आपणास पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐
शब्दांकन:- सचिन गारुडकर





No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा